Join us

आदेश बांदेकरांच्या सासूबाईंना पाहिलंय का? आईची कार्बन कॉपी आहेत सुचित्रा बांदेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:30 IST

Adesh bandekar: सोशल मीडियावर सध्या आदेश यांच्या सासूबाईंची म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्या आईची चर्चा होत आहे.

होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर. या कार्यक्रमामुळे लोकप्रिय झालेल्या आदेश बांदेकर यांनी यापूर्वी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची कायम चर्चा रंगत असते. प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येणारे आदेश बांदेकर यावेळी त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहेत.

सोशल मीडियावर सध्या आदेश यांच्या सासूबाईंची म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्या आईची चर्चा होत आहे. आदेश यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे त्या बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात मदर्स डेचं निमित्त साधत त्यांनी त्यांच्या आईसोबतचा फोटो शेअर केला.

सुचित्रा यांच्या आई अत्यंत साध्यासुध्या असून त्या स्टारडमपासून बऱ्याच दूर आहेत. परंतु, त्यांच्यातील साधेपणा सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांचं लव्हमॅरेज झालं आहे. सुरुवातीला सुचित्रा यांच्या आईचा या लग्नाला विरोध होता. मात्र, त्यानंतर त्यांनी या लग्नाला परवानगी दिली. 

टॅग्स :आदेश बांदेकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन