Anshuman Vichare: 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'फू बाई फू' यांसारख्या कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेल्या अंशुमन विचारेने (Anshuman Vichare) प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विनोदाचं अचूट टायमिंग साधत त्याने कायमच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सोशल मीडियावरअंशुमन विचारे खूप सक्रिय असतो. त्याद्वारे आपल्या कुटुंबीयांसोबतचे फोटो,व्हिडीओ सतत शेअर करत असतो. त्याची पत्नी पल्लवी विचारे देखील मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, नुकताच अभिनेत्याने लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, आज अंशुमन विचारेच्या लेकीच्या वाढदिवस आहे. त्याची लेक अन्वीला वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "तुझं आयुष्यात येणं म्हणजे आनंद , तुझं सतत अवतीभवती असणं म्हणजे परमानंद. तुझ्यामुळे आयुष्य जगावंस वाटणं म्हणजे आयुष्याची पूर्ती, वाढदिवसाच्या शुभेच्छा सोनू ...तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच दत्तगुरु चरणी प्रार्थना!"
अंशुमन विचारेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर,अभिनेत्याने वेगवेगळ्या मराठी मालिका, नाटक तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. संघर्ष, भरत आला परत, मिसळ पाव, सूर राहू दे, शिनमा, परतू, पोश्टर बॉईज, वेड लावी जिवा या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.