Join us

'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 14:29 IST

भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज क्रिकेटपटूसोबत अशोक सराफ सुरुवातीच्या काळात गल्ली क्रिकेट खेळायचे. कोण होता हा खेळाडू? (ashok saraf)

अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर या जोडीने एक काळ गाजवलाय. या दोघांचे सिनेमे म्हणजे मनोरंजनाची हमखास गॅरंटी हे समीकरण जणू ठरलेलं आहे. अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर या जोडीचे 'अशी ही बनवाबनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'एकुलती एक', 'आत्मविश्वास' हे मराठी सिनेमे चांगलेच गाजले. यापैकी अशोक सराफ यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ते एका दिग्गज क्रिकेटपटूसोबत क्रिकेट कसे खेळायचे, याची खास आठवण सांगितली आहे. 

अशोक सराफ या दिग्गज क्रिकेटपटूसोबत खेळायचे क्रिकेट

focusedindian या युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले, "लहानपणी आम्ही कोणासोबत क्रिकेट खेळायचो माहितीये? सुनील गावस्कर. सुनील जो शॉट मारायचा तो धावत धावत जाऊन बॉल आणण्यापर्यंत आमचा व्यायाम व्हायचा. स्ट्रेट ग्राऊंड शॉट मारण्यात सुनील गावस्कर पटाईत होता. आम्ही गल्लीत खेळायचो. सुनील माझ्या बाजूला राहायचा. त्यावेळी सुनील काचा फोडायचा शॉट मारताना. त्यामुळे काचा फोडायच्या नाही म्हणून सुनील बॉल उचलून ग्राऊंड शॉट मारायचा."

अशोक सराफ पुढे म्हणतात, "आम्ही जगातले सगळे खेळ थोडे थोडे खेळले आहेत. काय खेळायचो आम्ही. खूप थकायचो. संध्याकाळ होऊन रात्र झाली की अंथरुणात पडल्या पडल्या झोप लागायची. हा फिटनेस तिथूनच आलाय. लगोरी, आट्यापिट्या, क्रिकेट असे सगळे खेळ खेळून झाले आहेत." अशोक सराफ - सचिन पिळगावकर जोडीचा 'नवरा माझा नवसाचा २' सिनेमा आज सगळीकडे रिलीज झालाय.

टॅग्स :अशोक सराफसुनील गावसकरसचिन पिळगांवकर