अतुल परचुरेंचं आज वयाच्या ५७ व्या वर्षी दुःखद निधन झालं. दीर्घ आजाराने अतुल यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जातेय. अतुल हे प्रत्येक कलाकाराचे जिवलग मित्र होतेच. शिवाय मनोरंजन विश्वातील अभिनेत्री - अभिनेत्यांना एक कलाकार म्हणून अतुल परचुरेंविषयी नितांत आदर होता. अतुल यांच्या निधनानंतर कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनेता सुबोध भावे लिहितो, "अतुल मित्रा 😑😑😑😑😑😑 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏"
अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर लिहितात, "लाडक्या मित्रा असं व्हायला नको होते, खुप लढलास! खुप सहन केलेस . तुझी उणीव सदैव भासणार. तुझ्या खट्याळ हास्याची आठवण सदैव राहील. तुझ्या आत्म्यास शांती लाभो व कुटूंवास दुख्ख सहन करण्याची शक्ति."
अभिनेते सचिन पिळगावकर लिहितात, " अतुल परचुरे सारखा कलाकार आणि मित्र गमवल्याचं दुखः खूपच त्रासदायक आहे त्याला आम्ही कधीच विसरू शकणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली."
अभिनेते वैभव मांगले लिहितात, "अतुल मित्रा… मुंबईत आलो तेव्हा पहिला तू भेटलास… तू धीर देऊन म्हणालास स्वतःवर विश्वास ठेव .. आणि काम कर. तेव्हा पासून एक सहृदयता जपली होतीस माझ्या बाबतीत . खूप प्रेम मिळालं तुझ्या कडून ..तुझ्या सारखा पु.ल. झाला नाही."
अभिनेता कपिल होनराव लिहितो, "अतुल सर.. तुम्ही खळखळून हसवलत.. अनेक हिंदी, मराठी सिनेमा मधे अप्रतिम अभिनय करून... आमच मनोरंजन केलत.. आज ही तुमचे सिन आठवणीत आहेत... अजय , शारुख , अक्षय कुमार सारखे हीरो असून देखील.. तुम्ही तुमच्या अभिनयाने लोकांना दखल घायला भाग पाडलत... all the best मधला.. धोंडू जस्ट चिल असेल, बल्लु मधला... तुमचा सिन असेल... खट्टा मिठा मधला असरानी सोबत चा सीन असेल.. मेरी मां का ऑपरटेशन है.... अश्या किती तरी तुमच्या भूमिका तुम्ही अजरामर केलात ... you will be missed ... भावपूर्ण श्रद्धांजली."
गायक - संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी लिहितात, "अतुल मित्रा....तुझा हा असाच मिश्किल..अवखळ चेहरा आणि त्यामागे एक खोल विचारी माणूस....अजून खूप काळ बघायचा होता...आपल्याला लहान मुलांसाठी किती कार्यक्रम करायचे होते....असा कसा गेलास ?"
अभिनेता पॅडी कांबळेने अतुल परचुरेंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता शशांक केतकरने अतुल परचुरेंचा खास फोटो शेअर करुन लिहिलंय की,"अतुल दादा. खूप हसवलंस, शिकवलंस, प्रेम केलेस आणि शेवटी रडवलंस.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लिहिते, "अतुल.. हे खरं नाही." अभिनेता - दिग्दर्शक योगेश देशपांडे लिहितो, "प्रिय अतुल पुढच्या कामासाठी लवकर भेटायचं म्हणून आपण आताच शूटींग संपवलं आणि आज मात्र तू..."