Join us

'बाप दाखव नाहीतर...', चिन्मय मांडलेकर स्पष्टच बोलला; परंपरागत मतदारांवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 9:12 AM

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर चिन्मय मांडलेकरचं विधान

सध्या सगळीकडे निवडणूकांचं वातावरण आहे. मनोरंजनविश्वातही लोकसभा निवडणूकांचीच चर्चा आहे. सेलिब्रिटी त्यांचे राजकीय विचार मांडत आहेत. अनेकजण राजकीय पक्षांच्या कँपेनिंगसाठीही उतरले आहेत. मराठी अभिनेताचिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) नुकतंच राजकारण आणि निवडणुकांवर त्याचं मत मांडलं. मत देताना मतदार म्हणून आपण किती विचार केला पाहिजे हे त्याने सांगितलं.

चिन्मय मांडलेकर प्रतिभावान अभिनेता तसंच लेखकही आहे. अनेक मराठी मालिकांचं त्याने लेखन केलं आहे. शिवाय मराठी, हिंदी मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने नुकतीच 'अजब गजब'ला मुलाखत दिली. तो म्हणाला, "मला असं वाटतं की हे जे आपण मत देतो ते महत्वाचं. दर निवडणूकीत व्यवस्थित विचार करुन मत देतो. १८ व्या वर्षापासून मी दर निवडणूकाला मत देतोय आणि दरवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मत देतो. माझी राजकीय भूमिका हीच आहे की जो काम करेन त्याला मत द्या. जे लॉयल म्हणजेच परंपरागत मतदार असतात तेच लोकशाहीची सर्वात जास्त ठासतात. काहीही झालं तरी माझं मत यालाच तसं मी करत नाही. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असं माझं आहे." 

चिन्मय मांडलेकरचं हे वक्तव्य अनेकांना पटलं आहे. त्याचे राजकीय विचार त्याने अतिशय स्पष्टपणे मांडलेत. चिन्मयने दिग्दर्शित केलेलं 'गालिब' हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजतंय. दिग्पाल लांजेकरच्या सिनेमांमध्ये त्याने शिवाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारली. शिवाय तो सध्या सुरु असलेल्या 'इंद्रायणी' मालिकेचा लेखक आहे.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरमराठी अभिनेतालोकसभामतदानलोकशाही