Join us

“फडणवीस आता शिंदेजी आणि अजितजी यांची मजा...”, भिडेंच्या वक्तव्यानंतर किशोर कदमांची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 16:33 IST

संभाजी भिडेंच्या गांधींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर किशोर कदम यांची पोस्ट, म्हणाले, "अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना..."

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. कधी करोना तर कधी महिलांच्या टिकलीवरुन वक्तव्य करणारे संभाजी भिडे चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधी यांच्या वडिलांबद्दल केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे त्यांचे वडील नसून मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा दावा संभाजी भिडेंनी अमरावतीत केला.

संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम यांनी संभाजी भिडेंच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भिडेंच्या या विधानाबाबत किशोर कदम यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

“देशात राजकारण्यांची भीती घातली आहे”, शशांकचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाला, “खड्ड्यांमुळे गाडीचे टायर...”

“अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत. आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणवीसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे, मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करीत आहे,” असं किशोर कदम यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आजीबाई Rocks! १०५ वर्षीय आजींनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘बाईपण भारी देवा’, म्हणाल्या...

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर विधानसभेत विरोधकांकडून भिडेंवर कारवाई करण्याचा मुद्दा उचलून धरला गेला होता.

 

टॅग्स :संभाजी भिडे गुरुजीकिशोर कदममहात्मा गांधीमराठी अभिनेता