दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बॉलिवूडप्रमाणे मराठी सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात दिवाळी साजरी करत आहेत. पण, वाढत्या प्रदुषणामुळे फटाके फोडण्यावर निर्बंध आल्यामुळे दिवाळी सेलिब्रेशनला कुठेतरी ब्रेक लागल्याचं चित्र आहे. याबाबत 'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेने पोस्ट लिहिली आहे. सध्या कुशलही दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन करत आहे. कुशलने सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन फटाके फोडतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने बालपणीची आठवण सांगत भावुक पोस्ट लिहिली आहे.
आमच्या लहानपणी, दिवाळीतले फटाके म्हणजे social media वर पेटवला जाणारा pollution चा मुद्दा नव्हता. जसा कंदील,रांगोळी, दिवे, ऊटण असतं तसंच फटाकेही असायचेच. आमच्या लहानपणी, आम्ही फटाके फोडत असताना माझे पप्पा घराच्या ओट्यावर बसून, आमच्यावर लक्ष ठेवायचे “लवंगी फटाक्यांच्या माळेला” जी पुढे “गाठ” असते ती सोडवून एक एक फटाका सुटा करून द्यायचे...
माझी दिवाळी खूप वेळ वाजत राहायची…आता मात्र फटाके फोडायला वेळेची बंधन आहेत. पण, फटाक्यांंचं स्वरुप कमालीचं बदललंय डोळ्यांना दीपवून टाकणारे, आसमंत उजळवून टाकणारे, वेगवेगळे रंग आणि आवाज काढणारे एका भुईचक्रातून असंख्य भुईचक्र निघणारे, भारावून टाकणारे फटाके मिळतात बाजारात. हल्ली दिवाळी खूप भारी असते…फक्त साला, तो “गाठी सोडवून देणारा” माणूस आयुष्यात राहिला नाही एवढंच…
ही पोस्ट शेअर करत कुशल वडिलांच्या आठवणीत भावुक झाला आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.