ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. हंपी, आनंदी गोपाळ या सिनेमातील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या. आता याच ललितचा एक व्हिडीओ गाजतोय. होय, त्यानं शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ललितचा हा भन्नाट आणि मजेशीर व्हिडीओ पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही.
चॉकलेट बॉय ललित प्रभाकरच्या हँडसम लुक आणि अदांवर तरूणी फिदा आहेत. पण तो अद्यापही सिंगल आहे आणि या सिंगल असण्याचं कारण मोठ मजेशीर आहे. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण ललितचं लग्न ठरलं होतं. पण पसंत पडलेल्या मुलीनं असं काही केलं की, ठरलेलं लग्न मोडलं. वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. विश्वास बसत नसेल तर सोबतचा व्हिडीओ पाहा.
ललितच्या एका व्हिडिओची सध्या बरीच चर्चा होते आहे . ‘रिश्ता पक्का होने वाला था तभी उसने अंदर से आवाज लगाई... मम्मी चाय में कितनी शिटी लगाऊ...,’ असं तो यात म्हणतो. सध्या हे धम्माल विनोदी रील तुफान व्हायरल होतंय.
ललित हा एक गुणी अभिनेता आहे रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका तसंच ‘चि. व चि.सौ.कां’ या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. याशिवाय ढोल ताशे आणि पती गेले गं काठेवाडी यासह विविध नाटकतही त्याने प्रमुख तसंच लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.