Join us

"...प्रत्येक बहिणीच्या पाठिशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा", प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 16:50 IST

Prasad oak: भाऊबीजेच्या निमित्ताने प्रसादने ही पोस्ट शेअर केली आहे.

उत्तम अभिनेता, दिग्दर्शक अशा एकाच वेळी कितीतरी भूमिका चोखंदळपणे पार पाडणारा  अभिनेता म्हणजे प्रसाद ओक (prasad oak). काही काळापूर्वीच त्याचा 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे या सिनेमाची क्रेझ जराही कमी झालेली नाही. त्यातच प्रसाद ओकदेखील वरचेवर या सिनेमाविषयी किंवा आनंद दिघे यांच्याविषयीच्या पोस्ट शेअर  करत असतो. आज भाऊबीजेच्या निमित्ताने प्रसादने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रत्येक भाऊ हा आनंद दिघे यांच्यासारखा असावा असं म्हटलं आहे.

प्रसादने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने धर्मवीर सिनेमातील आनंद दिघे यांच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. सोबतच या फोटोवर त्याने लक्ष वेधून घेणारं कॅप्शन दिलं आहे.

"भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम रहावा,प्रत्येक बहिणीच्या पाठिशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा", असं कॅप्शन प्रसादने या फोटोवर दिलं आहे.  दरम्यान, प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेतासेलिब्रिटीसेलिब्रिटींची दिवाळी