Join us

Video: '30 सेकंदच्या कटसाठी...' 'तुझ्यात जीव रंगला'फेम अभिनेत्याने दाखवलं पडद्यामागचं विश्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 18:58 IST

Raj hanchanale: कलाकारांचा अभिनय पडद्यावर उत्तम दिसावा यासाठी पडद्यामागे अनेक जण काम करत असतात. याच लोकांसाठी राजने ही खास पोस्ट शेअर केली आहे.

राणादा आणि अंजलीबाई यांची गावरान लव्हस्टोरी उलगडणारी मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला. ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली. त्यामुळेच या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. यात सध्या मालिकेतील सूरज म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे याची चर्चा रंगली आहे. राज सध्या ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या निमित्ताने मालिकेचं शुटिंग करताना सेटवर लोकांना किती मेहनत घ्यावी लागते हे सांगितलं आहे.

राज सध्या जिवाची होतीये काहिली या मालिकेत काम करत आहे. याच मालिकेच्या सेटवरुन त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पडद्यामागे कलाकार आणि अन्य कर्मचारी कशाप्रकारे मेहनत करतात हे सांगितलं. सोबतच त्याने दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

“30 सेकंदच्या कटसाठी संपुर्ण टीमला किती धावपळ, मेहनत करावी लागते आणि हे सर्व फक्त technical गोष्टीसाठी नाही तर आपल्या सोबतच्या कलाकाराला emotions साठी योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी सुद्धा. खूप खूप आभार. टीम जिवाची होतिया काहिली. हा प्रवास असाच चालू राहो”, असं राजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

टॅग्स :राज हंचनाळेसेलिब्रिटीहार्दिक जोशीअक्षया देवधरटेलिव्हिजन