Join us

८०च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील या हॅण्डसम अभिनेत्याचे बॉलिवूडमध्ये कमबॅक, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 1:21 PM

ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हिरो बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे.

ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हिरो रवींद्र महाजनी यांनी आराम हराम आहे, मुंबईचा फौजदार, झुंज, कळत नकळत यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांनी फार कमी चित्रपटात काम केले पण तरीदेखील आजही प्रेक्षकांच्या मनात त्यांचं स्थान कायम आहे. २०१५ साली कॅरी ऑन मराठा व देऊळबंद चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. त्यानंतर आता ते बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहेत. 

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपट पानिपतमध्ये रवींद्र महाजनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात ते मल्हार राव होळकर ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

या चित्रपटात त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनीदेखील काम करतो आहे. तो जंकोजी शिंदेंच्या भूमिकेत दिसणार आहे. 

हा चित्रपट पानिपतच्या युद्धावर आधारित कथा आहे. यात गश्मीरसह संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

अर्जुन कपूर यात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. पानिपत या चित्रपटात पद्मिनी गोपिका बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिकेत दिसणार आहे.

तर पार्वतीबाई पानीपत संग्रामाच्यावेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री क्रिती सॅनन मेहनत घेत आहे.

६ डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :रविंद्र महाजनीपानिपतअर्जुन कपूरक्रिती सनॉनआशुतोष गोवारिकरगश्मिर महाजनी