मराठी कलाविश्वातील सदाबहार जोडी म्हणजे सचिन पिळगांवकर (sachin pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (supriya pilgaonkar). या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे त्यांची जोडी रुपेरी पडद्यावर हिट आहेच. मात्र, रिअल लाइफमध्येदेखील ही जोडी तितकीच सुपरहिट आणि लोकप्रिय आहे. एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न केलेल्या या जोडीच्या संसाराला कित्येक वर्ष उलटली. मात्र, त्यांच्यातील प्रेम अद्यापही कायम आहे.याचा प्रत्यय नुकताच चाहत्यांना आला आहे.
सध्या ही जोडी मालदीवमध्ये त्यांची सुट्टी एन्जॉय करत आहे. त्यांच्यासोबत त्यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकर सुद्धा आहे. त्यामुळे हे कुटुंब सध्या त्यांच्या व्हेकेशनमधील अनेक फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. यामध्येच त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही जोडी निळ्याशार समुद्रासमोर बसली असून मस्त गाणी म्हणण्याचा आनंद लुटत आहेत. यावेळी 'सागर किनारे..दिल ये पुकारे..' हे गाणं दोघंही गुणगुणत आहेत. विशेष म्हणजे या निमित्ताने ते पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. त्यांचा हा सुंदर व्हिडीओ त्यांची लेक श्रिया हिने शूट केला आहे. त्यामुळे त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी तुफान कमेंटचा पाऊस पाडत आहेत.