Join us

सचिन पिळगांवकर होणार कलाविश्वातून रिटायर्ड?; निवृत्तीबाबत केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 4:49 PM

Sachin pilgaonkar: लवकरच ते 'सिटी ऑफ ड्रिम्स' या सीरिजमध्ये झळकणार आहेत. या सीरिजच्या निमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली

 'नवरी मिळे नवऱ्याला', 'अशी ही बनवाबनवी', 'आमच्यासारखे आम्हीच', 'शोले', 'नदिया के पार', 'गीत गाता चल' अशा कितीरी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये झळकलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे सचिन पिळगांवकर. जवळपास ६० वर्षांपासून सचिन सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. दर्जेदार अभिनयशैली आणि सुस्वभावी स्वभाव यामुळे सचिन पिळगांवकर आज लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे इतकी वर्ष कलाविश्वात सक्रीय सहभाग असणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या निवृत्तीविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

सचिन पिळगांवकर यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी ओटीटीकडे आपला मोर्चा वळवला आहे. लवकरच ते 'सिटी ऑफ ड्रिम्स' या सीरिजमध्ये झळकणार आहेत. या सीरिजच्या निमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी निवृत्तीविषयी भाष्य केलं.सचिन पिळगांवकर खरंच होणार निवृत्त?

“व्हिस्कीच्या बाटलीला आणि एखाद्या अभिनेत्याला एक्सपायरी डेट असते असं मला अजिबात वाटत नाही. यामध्ये मी दोन्ही गोष्टींचा सन्मान करतोय. मला वाटतं काही गोष्टी या कायम आपल्यातच राहतात आणि त्यात काहीच गैर नाही. फक्त तुम्ही कधीही स्वत:ला इतरांवर लादायचा प्रयत्न करु नका. जे तुमच्या वयाला शोभत नाही ते तुम्ही करु नका. आणि, माझ्यासारखी व्यक्ती तर निवृत्तीबाबत विचारही करु शकत नाही, असं सचिन पिळगांवकर म्हणाले.दरम्यान, सिटी ऑफ ड्रीम्स या सीरिजमध्ये सचिन पिळगांवकर, जगदीश गुरव या एका धुर्त आणि कपटी नेत्याची भूमिका साकारत आहेत. या सीरिजचा तिसरा सीझन २६ मे रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सचिन पिळगांवकर