'ब्लॅक फ्रायडे', 'गँग ऑफ वासेपूर', 'रमन राघव' अशा सिनेमांचा दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. अनुरागने अलीकडेच 'महाराजा' सिनेमातून त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच छाप पाडली. अनुरागच्या सिनेमात त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरचं हेच स्वप्न पूर्ण झालंय. संतोषने अनुराग कश्यपसोबतचा फोटो पोस्ट करुन याविषयी खास पोस्ट लिहिली आहे.
संतोष लिहितो, "हा एक माथेफिरू दिग्दर्शक आहे. वेड्यासारखं काम करत राहायचं, ह्या माणसाचं व्यसन आहे आणि ह्या वेड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं वेड आणि स्वप्नं माझं फार आधीपासून होत. आणि ते इतकं मनापासून पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालंच आखिर मुझे AK बाबा का बुलावा आही गया. आत्ता पर्यंत अनेक उत्तमोत्तम दिग्दर्शकांन सोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या शैलीत काम करण्याचा अनुभवही मी कमावलाय."
संतोष पुढे लिहितो, "अनुराग सरांसोबत काम करण्याआधी त्यांची कामाची style आणि कामाच्या पद्धती बद्दल ऐकून होतो पण गेले काहीदिवस त्यांच्यासोबत काम करताना ह्याची देही ह्याची डोळा अनुभव घेतोय. माझ्यासाठी ह्या सिनेमात काम करणं म्हणजे एक कार्यशाळा आहे. AK sir love u for this opportunity. "आपके साथ काम करनेका एक सपना पुरा करके आपके साथ और काम करनेका सपना देखना शुरु करदिया मैने." Respect & love sirji (Ak papa) Lott's of love to all team." आता संतोष अनुरागसोबत नेमक्या कोणत्या सिनेमात काम करतोय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान संतोष लवकरच विकी कौशलसोबत 'छावा' सिनेमात झळकणार आहे.