Join us

श्रेयस तळपदेला डिस्चार्ज कधी मिळणार? जवळचा मित्र सोहम शाहने दिली हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 12:32 PM

श्रेयसची तब्येत कशी आहे आणि त्याला कधी डिस्चार्ज मिळणार याबाबत नुकतीच माहिती समोर आली आहे.

मराठी अभिनेताश्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने अॅडमिट करण्यात आले होते. यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टीही केली. आता श्रेयसची तब्येत कशी आहे आणि त्याला कधी डिस्चार्ज मिळणार याबाबत नुकतीच माहिती समोर आली आहे. श्रेयसचा मित्र आणि फिल्ममेकर सोहम शाहने (Soham Shah) ही माहिती माध्यमांसोबत शेअर केली आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'शी केलेल्या बातचीतमध्ये सोहम शाह म्हणाला, 'श्रेयस रविवारी रात्री किंवा सोमवारी डिस्चार्ज मिळेल. आता त्याची तब्येत स्थिर आहे. ज्या रात्री त्याला रुग्णालयात आणले गेले त्याच रात्री मीही तिथे पोहोचलो होतो. आजही मी तिथेच होतो. श्रेयसला हसताना आणि नेहमीसारखंच त्याच्या अंदाजात बोलताना पाहून बरं वाटलं. देवाच्या कृपेने त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि सर्वांचे आशीर्वाद त्याच्यासोबत आहेत.'

श्रेयस लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून त्याचे हितचिंतक प्रार्थना करतच आहेत. सोशल मीडियावरही श्रेयसच्या तब्येतीविषयी चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. आता आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत त्याला डिस्चार्ज मिळणार आहे. अभिनेता बॉबी देओलनेही श्रेयसच्या तब्येतीविषयी दोन दिवसांपूर्वी माहिती दिली होती. श्रेयसच्या हृदयाचे ठोके 10 मिनिटांसाठी थांबले होते असं तो म्हणाला होता. म्हणूनच त्याच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. 

श्रेयस त्याच्या आगामी 'वेलमक टू जंगल' सिनेमाचं शूटिंग करत होता. त्याने गुरुवारी सिनेमातील काही अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट केले होते. दिवसभर तो शूटिंग करत होता आणि त्याची प्रकृती उत्तम होती. पण शूटिंग संपल्यानंतर तो घरी आला, घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याच्या पत्नीने लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. 

टॅग्स :श्रेयस तळपदेमराठी अभिनेताबॉलिवूडहॉस्पिटलहृदयविकाराचा झटका