Join us

पहिल्यांदाच वडिलांविषयी व्यक्त झाला सिद्धार्थ चांदेकर; म्हणाला, 'वडिलांची जागा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 6:45 PM

Siddharth chandekar: सिद्धार्थने पहिल्यांदाच त्याच्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनेकांच्या गळ्यातलं ताईत असलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar). अलिकडेच सिद्धार्थ 'झिम्मा 2' या सिनेमात झळकला. हा सिनेमा सुपरहिट ठरला असून सध्या तो चर्चेत आहे. कलाविश्वात सक्रीय असलेला सिद्धार्थ बऱ्याचदा त्याच्या बोल्ड आणि फॉर्वर्ड विचारांमुळे चर्चेत येत असतो. अलिकडेच सिद्धार्थने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच तो त्याच्या वडिलांविषयी व्यक्त झाला.

काही काळापूर्वीच सिद्धार्थने त्याच्या आईचं दुसरं लग्न करुन दिलं. या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. अनेकांनी त्याचं कौतुक केलं. तर, काहींनी त्याच्यावर टीकाही केली. मात्र, त्याने या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं. त्यानंतर पहिल्यांदाच तो त्याच्या वडिलांविषयी व्यक्त झाला आहे. 'वडिलांची माया काय असते हे माहित नाही', असं म्हणत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

नेमकं काय म्हणाला सिद्धार्थ?

"माझ्यासाठी वडील हा चाप्टरचं पूर्णपणे क्लोज आहे. लहानपणापासूनच किंवा लहानपणी वडिलांची माया असं काहीच नव्हतं. कारण, वडीलच नव्हते आजूबाजूला. मला माहितीये की माझे वडील आहेत. पण, ते कुठे आहेत हे अजूनही माहित नाहीयेत. शेजारपाजारचे विचारायचे, काय मग वडील कुठेत आ..?, काय कसलं भांडण चाललं होतं?,असं म्हणत सिद्धार्थने त्याच्या वडिलांचा किस्सा शेअर केला. सोबतच त्याने त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाविषयी सुद्धा भाष्य केलं.

पुढे तो म्हणतो, "पन्नाशीनंतर एका बाईला तिच्या पार्टनरसोबतचा संवाद हवा असतो. ते आईसाठी किती काय काय करतील यापेक्षा त्यांना आईसाठी किती काय काय करावंसं वाटतंय हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. माझ्या वडिलांची जागा कोणीच भरुन काढू शकत नाही."

दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्याने पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर हिच्याविषयी सुद्धा भाष्य केलं. मिताली मयेकर आता सोशल मीडियावर अँड्स, ब्रँड प्रमोशन असं स्वत:चं स्वत: मॅनेज करुन तिचे पैसे कमवते.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरसेलिब्रिटीमिताली मयेकरमराठी अभिनेता