Join us

"माऊलीची माया होता माझा भीमराया", बाबासाहेबांसाठी सिद्धार्थने गायलं गाणं, दिली खास मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 12:34 PM

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सिद्धार्थची मानवंदना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त गायलं गाणं

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७वा महापरिनिर्वाण दिन आहे. देशभरातून या महामानवाला अभिवादन केलं जात आहे. अनेक नेते, कलाकार सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आंबेडकरांना अभिवादन करत आहेत. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने अनोख्या शैलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली आहे. 

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सिद्धार्थ गाणं गाताना दिसत आहे.  'होऊ दे धिंगाणा'च्या मंचावरून अभिनेत्याने "माऊलीची माया होता माझा भीमराया" हे गाणं गाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादव केलं आहे. "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम", असं कॅप्शन सिद्धार्थने या व्हिडिओला दिलं आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. 

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थने अगदी कमी वेळात मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारून सिद्धार्थने अभिनयात जम बसवला. सध्या तो 'होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  

टॅग्स :सिद्धार्थ जाधवडॉ. बाबासाहेब आंबेडकरमराठी अभिनेता