Join us

'नाटक करायला मी तयारच नव्हतो..'; वैभव मांगलेंनी सोडलं 'अलबत्या गलबत्या';कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:05 PM

Vaibhav mangle: वैभव मांगले यांनी एका मुलाखतीमध्ये नाटक सोडण्यामागचं कारण सांगितलं.

नाटक, मालिका, सिनेमा अशा प्रत्येक मंचावर मुक्तपणे वावर करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे वैभव मांगले. अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलेल्या वैभव मांगले यांचं मध्यंतरी आलेलं 'अलबत्या गलबत्या' हे नाटक तुफान गाजलं. प्रेक्षकांनी या नाटकांला उदंड प्रतिसाद दिला. या नाटकात वैभव मांगले यांनी चिंची चेटकीण ही भूमिका साकारली होती. परंतु, काही महिन्यांपूर्वीच त्यांनी हे नाटक सोडलं. त्यानंतर आता त्यांनी या नाटकाला रामराम करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

अलिकडेच वैभव मांगले (vaibhav mangale) यांनी 'मित्र म्हणे' या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 'अलबत्या गलबत्या' हे नाटक का सोडलं ते सांगितलं. त्यामुळे सध्या त्यांची मुलाखत चर्चेत येत आहे.

काय म्हणाले वैभव मांगले?

“मी अलबत्या गलबत्या नाटक जेव्हा केलं, त्यावेळी झी मराठी होतं, निलेश मयेकर होता. अत्यंत हुशार आणि दूरदृष्टी असणारा निलेश तेव्हा झी मध्ये हेड पदावर काम करत होता. हे नाटक करणं त्याचा प्रस्ताव होता. त्याच्या प्रस्तावामुळे त्यावेळी झी टॉपवर होतं. त्यामुळे अलबत्या गलबत्या सुद्धा हिट झालं. त्यावेळी, जर या नाटकात तू चेटकिणीची भूमिका करणार असशील तरच हे नाटक आपण करु असं तो म्हणाला. त्यातही बालनाट्य करायचं की नाही, का प्रश्न होताच. मात्र, मला निलेशवर पूर्ण विश्वास होता. आणि, झीचं सध्या काहीही लोक बघतात. झी वर त्यावेळी चाललेला प्रत्येक कार्यक्रम लोक पाहात होती. कारण, लोकांना विश्वास, सवय होती, असं वैभव मांगले म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "झीचं अलबत्या गलबत्या हे नवीन नाटक येतंय असं लोकांना कळलं आणि ते अक्षरश: तुटून पडले. आम्ही या नाटकाचे खूप प्रयोग केले. पण, ठराविक काळाने या नाटकासाठीचं बुकिंग कमी झालं. कारण, झीचं थोडं डाऊन झालंय.  खरं तर आम्ही ते नाटक सुट्ट्यांच्या वेळी काढायला हवं होतं. ज्यावेळी मुलांना मोकळा वेळ असतो. आम्ही दीड वर्ष हे नाटक केलं त्यामुळे पुढे नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांचा कल कमी झाला. बुकिंग कमी झालं. निर्मात्यांशी वाद झाला. मला याच निर्मात्याचा ‘करुन गेलो गाव’ या नाटकावेळीही अनुभव आला होता. त्यामुळेच मी ते सोडलं. त्यानंतर ‘अलबत्या गलबत्या’ नाटकासाठी निलेशने आग्रह केला म्हणून मी ते केलं. मी ते नाटक करण्यासाठी आधी तयारच नव्हतो”.

टॅग्स :वैभव मांगलेनाटकसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन