अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) हा मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेटी हिरो. वैभव सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो, व्हिडीओ तो शेअर करत असतो. वैभवने नुकताच एक फोटो शेअर केला आणि या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला. होय, फोटोला कॅप्शन सुचवा अशी विनंती त्याने केली आणि वैभवच्या या फोटोला कॅप्शन सुचवण्याची चाहत्यांमध्ये जणू चढाओढ लागली. एकापेक्षा एक कमेंट करत चाहत्यांनी त्याच्यावरील प्रेम व्यक्त केलं. यापैकी काही कमेंट्स चांगल्याच भन्नाट आहे.
‘मेरी गाडी का टायर पंक्चर हो गया... कोई लिफ्ट भी नहीं दे रहा, इसलिए मैं पैदल जा रहा हूं घर,’ असं कॅप्शन एका चाहत्याने सुचवलं. ‘ वैभव भाऊ जोमात, बाकी सारे कोमात...’, अशी कमेंट एका चाहत्याने केली. एकाने चाहत्याने ‘हँडसम आॅन द रोड..’ असं कॅप्शन सुचवत वैभवचं कौतुक केलं. या सगळ्यात एक कमेंट खूपच भन्नाट आहे. ‘वैभव रस्त्यावर मस्त खिश्यात हात घालून निवांत चालत आहे, त्याच्या या फोटोला साजेशी कॅप्शन एका चाहत्याने दिली आहे. ‘आयफोन चोरीला जाऊ नये, खिशात हात घालूनच चालतो....’,असं कॅप्शन या चाहत्यानं सुचवलं. त्याच्या या कॅप्शनची चांगलीच चर्चा आहे. ‘तुझ्या फोटोला कॅप्शन देण्याची काय गरज... तुला बघून कॅप्शनकडे कुणाचं लक्ष जाणार?’, अशी मस्त कमेंट एका चाहतीने केली.
वैभवचा जन्म अमरावतीत झाला. वैभवने शाळेत असल्यापासूनच नाटकात काम करायला सुरूवात केली होती. त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत पुण्याच्या नाटकाच्या ग्रुप्समध्ये त्याचं नाव होऊ लागलं. नैसर्गिक अभिनय आणि अभिनयाची जाण असल्यामुळे वैभव खूपच प्रसिद्ध होऊ लागला. 2010 मध्ये त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले आणि तो अभिनय क्षेत्रात आपलं नशीब अजमावण्यासाठी मुंबईला आला. 2015 मध्ये आलेला "कॉफी आणि बरंच काही" हा सिनेमा त्याचा पहिला रोमँटिक ड्रामा असणारा सिनेमा होता.