Vikas Patil Video: अभिनेता विकास पाटील (Vikas patil) हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपटांमधून तो घराघरात पोहोचला आहे. विकास 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सुद्धा सहभागी झाला होता. या शोमुळे त्याची लोकप्रियता कमालीची वाढली. 'बिग बॉस'च्या या पर्वाशिवाय त्याची आणि अभिनेता विशास निकमची (Vishal Nikam) मैत्रीचीदेखील चर्चा झाली. अशातच नुकतीच अभिनेत्याने आपल्या मित्राच्या वाढिवसाच्या सेलिब्रेशनचा सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत.
काल १० जानेवारीच्या दिवशी अभिनेता विशाल निकमचा वाढदिवस होता. यानिमित्ताने विकासने आपल्या मित्राचा वाढदिवस अत्यंत साध्या आणि सुंदर पद्धतीने साजरा केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याने लिहिलंय की, "दिल चाहता है..., असेच तुझे वाढदिवस येत राहोत आणि आणि असेच आपण भेटत राहो (भेटण्यासाठी वाढदिवसाची वाट पाहणे हे काय बरोबर नाय भावा) पण काही असो मज्जा आली काल तुला भेटून,खूप दिवसांनी सगळ्या आठवणी ताज्या झाल्या."
पुढे अभिनेत्याने म्हटलंय, "असंच छान छान काम करत राहा आणि लोकांचं मनोरंजन करत राहा .. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख शुभेच्छा..., लव्ह यू भावा...!"
दरम्यान, विकास पाटीलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, सुरुवातीला विशाल आपल्या मित्राचं औक्षण करतो त्यानंतर केक कटिंग करून वाढदिवस साजरा करतो. हा व्हिडीओ लक्षवेधी ठरतो आहे. विकासने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री अक्षया हिंदळकर, हर्षदा खानविलकर आणि रेश्मा शिंदे यांनी त्यांच्या बॉण्डिंगचं कौतुक केलंय.