Join us

ती नाही... हा विचारसुद्धा सोसवत नाही...; मराठी कलाकारांनी सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 11:43 IST

Sindhutai Sapkal : 'समाजसेवेचं एक पर्व संपलं', असं रेणुका शहाणे यांनी लिहिलं. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिंधुताईंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी माईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 

अनाथांची माय या नावाने ओळखल्या जाणाऱ्याज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या निधनानंतर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाविश्वातील मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित माईंना श्रद्धांजली वाहिली. 

‘मी सिंधुताई सपकाळ’ या  सिंधुताईंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी माईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.  ‘फ्लॉरेन्स नाईटिंगेलला माझं शेवटचं विनम्र अभिवादन’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशी हिने कवितेच्या ओळींतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

समाजसेवेचं एक पर्व संपलं - रेणुका शहाणे

त्यांच्या आजवरच्या महानकार्याला मानाचा मुजरा- सोनाली कुलकर्णी

महाराष्ट्र आज अनाथ झाला- हेमंत ढोमे

माई... भावपूर्ण श्रध्दांजली-सुबोध भावे

 

टॅग्स :सिंधुताई सपकाळसुबोध भावे स्पृहा जोशी