Join us

"गावोगावी बायका नाचवण्यापेक्षा मुक्ताई सिनेमा दाखवा", मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 11:25 IST

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. या सिनेमाबाबत लिहिताना मराठी अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा सिनेमा १८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शिवअष्टकमधून शिवचरित्रावर सिनेमा बनवणाऱ्या दिग्पाल लांजेकरांनी पहिल्यांदाच वेगळ्या विषयाचा सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला आहे. या सिनेमातून अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग सर्वसामान्यांना दाखवणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची गोष्ट मुक्ताईच्या दृष्टीकोनातून दाखवली गेली आहे.

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. या सिनेमाबाबत लिहिताना मराठी अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. मराठी अभिनेत्री आरती सोळंकीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती लिहिते "महाराष्ट्रामध्ये गावोगावी बाया नाचवण्यापेक्षा मुक्ताई हा सिनेमा दाखवावा...ही समस्त मंडळांना विनंती". 

दरम्यान,  'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमात अभिनेता तेजस बर्वे ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत आहे. संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत  समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा  चित्रपटात भूमिका आहेत. 

टॅग्स :दिग्पाल लांजेकरसिनेमासेलिब्रिटी