Join us

मेहूल नव्हे हे आहे अभिज्ञाचं पहिलं प्रेम; फोटो पोस्ट करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 18:06 IST

Abhidnya Bhave: अभिज्ञाचं तिच्या वडिलांवर प्रचंड प्रेम असून ती कायम त्यांच्यासोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave). उत्तम अभिनयासह मनमोकळ्या स्वभावामुळे अभिज्ञाने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अलिकडेच अभिज्ञा तू तेव्हा तशी या मालिकेत झळकली होती. अभिज्ञा कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय असून कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असते. यात अलिकडेच तिने तिच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही व्यक्ती तिच्यासाठी अत्यंत खास आहे.

अभिज्ञाने तिच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिज्ञाने तिच्या वडिलांसोबतचे काही निवड फोटो शेअर केले आहेत. या फोटोकडे पाहिल्यानंतर तिचं तिच्या वडिलांवर असलेल्या प्रेमाचा अंदाज येतो. 

दरम्यान, प्रत्येक मुलीसाठी तिचं पहिलं प्रेम म्हणजे तिचे बाबाचं असतात. हेच अभिज्ञाच्या बाबतीही दिसून येतं. अभिज्ञाच्या या पोस्टवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :अभिज्ञा भावेसेलिब्रिटीटेलिव्हिजन