Join us

'तुझ्यात जीव रंगला'नंतर पुन्हा एकदा राणादा-पाठकबाई आले एकत्र; 'या' कार्यक्रमात हार्दिकसोबत दिसणार अक्षया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 16:18 IST

Akshaya-hardeek: अक्षया आणि हार्दिक यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते कधीपासून वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar)आणि हार्दिक जोशी (hardeek joshi). 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी घराघरात पोहोचली. परंतु, या गाजलेल्या मालिकेनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते. विशेष म्हणजे लवकरच चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर जाऊबाई गावात मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अक्षयाची झलक दिसून आली आहे. त्यामुळे या मालिकेत लवकरच अक्षयाची एन्ट्री होणार असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अक्षयाला पाहिल्यानंतर प्रेक्षक कमालीचे खूश झाले आहेत. परंतु, अक्षया नेमकी या कार्यक्रमात का आलीये? ती स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे का? की राणादासोबत सूत्रसंचालन करणार? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. 

दरम्यान,  या कार्यक्रमात अक्षया पाहुण्या कलाकाराच्या रुपात येणार आहे. ही स्पर्धकांसाठी एक नवीन कार्य घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिकला सुद्धा हे गोड सरप्राइज मिळणार आहे. त्यामुळे अक्षया या कार्यक्रमात आल्यानंतर गावात काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीटेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार