दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) भारतीय सिनेसृष्टीतील अतिशय प्रभावशाली फिल्ममेकर आहेत. त्यांचा सिनेमा हा त्यातील भव्य सेट, गाणी, नृत्य, कॉस्च्युममुळे ओळखला जातो. 'खामोशी', 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'गुजारिश' असे दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले. आता त्यांनी ओटीटीमध्येही एन्ट्री घेतली आहे. सहा अभिनेत्रींना घेऊन त्यांची 'हीरामंडी' ही वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होत आहे. कालच या सीरिजचा भव्य प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही या प्रीमिअरला हजेरी लावली.
अभिनेत्री अमृता खानविलकरनेसंजय लीला भन्साळींसोबतचा खास फोटो शेअर केला. यामध्ये भन्साळींनी तिच्या खांद्यावर ठेवला आहे आणि अमृता हसताना दिसतेय. लाईफटाईम मोमेंट असल्यासारखा तिच्यासाठी हा क्षण होता. अमृताने या फोटोसोबत तिचा एक सिंगल फोटोही शेअर केला आहे. अतिशय सुंदर साडीतील लूकमध्ये तिने प्रीमिअरला हजेरी लावली होती. या फोटोंसोबत अमृताने कॅप्शनमध्ये लिहिले, "काल रात्री एकमेव असे ग्रेट संजय भन्साळींसोबत हीरामंडी प्रीमिअरसाठी. असे अनुभव तुम्हाला आतापर्यंत केलेली मेहनत सार्थ ठरवतात. सर तुम्हाला खूप शुभेच्छा. "
अमृता खानविलकरने काही दिवसांपूर्वीच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या ती हंसल मेहतांच्या 'लुटेरे' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे.