Join us

'मी ब्रेक घेत आहे'; अमृता खानविलकरच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 12:26 IST

Amruta khanvilkar: तिच्या एका पोस्टमुळे चाहते चांगलेच चक्रावून गेले आहे. 'मी ब्रेक घेते' असं म्हणत अमृताने एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह राझी, मलंग या हिंदी सिनेमांमध्येही काम करत अमृताने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. परंतु, तिच्या एका पोस्टमुळे चाहते चांगलेच चक्रावून गेले आहे. 'मी ब्रेक घेते', असं म्हणत अमृताने एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत अमृताचं नाव आवर्जुन घेतलं जातं. इन्स्टावर तिचे ३.७ मिलिअन फॉलोअर्स आहेत. या चाहत्यांसोबत अमृता तिच्या जीवनातील अनेक लहानमोठे किस्से शेअर करत असते. यात तिची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

काय आहे अमृताची पोस्ट? 

 “मी तुला पुन्हा भेटेन…जेव्हा योग्यवेळी आपले मार्ग पुन्हा कधीतरी एकमेकांसमोर येतील. गुडबाय..मी ब्रेक घेत आहे. लवकरच पुन्हा एकदा भेटू, अशी पोस्ट अमृताने लिहिली आहे. 

अमृताची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अमृता इन्स्टाग्राम सोडणार का?  की तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही झालंय? वा तिच्या नव्या एखाद्या प्रोजेक्टचा हा भाग आहे का? असे कितीतरी प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.  परंतु, अमृताच्या या पोस्टचा अर्थ अजूनही कोणाला उलगडलेला नाही.

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाचंद्रमुखी