Join us

Amruta Subhash: मी नाही तर जया प्रेग्नंट आहे...; अमृताने शेअर केलेली ‘गुडन्यूज’ निघाली प्रमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 16:09 IST

Amruta Subhash Pregant : अमृता सुभाष लवकरच आई होणार, ही आनंदाची वार्ता क्षणात पसरली. चाहत्यांसकट अगदी सेलिब्रिटींनीही अमृताचं अभिनंदन केलं.  पण...

Amruta Subhash Pregant : अमृता सुभाष  (Amruta Subhash) ही एक गुणी अभिनेत्री. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवणाऱ्या अमृताने सकाळी सकाळी एक गोड बातमी शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.  होय, प्रेग्नंसी टेस्टचा फोटो तिने शेअर केला आणि मग काय? अमृता सुभाषवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. अमृता सुभाष लवकरच आई होणार, ही आनंदाची वार्ता क्षणात पसरली. चाहत्यांसकट अगदी सेलिब्रिटींनीही अमृताचं अभिनंदन केलं. 

अमृताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर प्रेग्नंसी टेस्टचा फोटो शेअर केला. या फोटोत एक प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली स्ट्रीप आणि एक बाळाचं खेळणं दिसलं. ‘ओह... द वंडर बीगिन्स...’, असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहताच,  चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला.  पण हा शुभेच्छांचा वर्षाव अमृताच्या एका पोस्टनंतर खंडित झाला. कारण अमृता प्रेग्नंट नाहीच मुळी.  ‘वंडर वुमन’ या आगामी प्रोजेक्टसाठी केलेली ही एक प्रमोशनल पोस्ट होती, हे आता स्पष्ट झालं आहे. खुद्द अमृताने हे स्पष्ट केलं आहे.

अमृता खऱ्या आयुष्यात आई होणार नसून ‘जया’ आई होणार आहे. ‘वंडर वुमेन’मध्ये अमृता जया नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे. ‘तर, ती मी नाही... वंडर वुमेनमधील जया प्रेग्नंट आहे.... तुम्ही सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तसाच जयावरही करा,’ असं अमृताने नव्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे.  हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या नाटकात काम तिने काम केलं. तिचं ‘ती फुलराणी’ हे नाटक तुफान गाजलं. 2004 साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे.  अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचं 2014 साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.

 

टॅग्स :अमृता सुभाषमराठी अभिनेता