मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडालीय. केतकीचा चुलत भाऊ अक्षय अमोल माटेगावकर याने पुण्यात हिंजवडी येथे आठव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. दरम्यान या घटनेनं माटेगावकर कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.
अमोल हा पुण्यातील नामांकित सिम्बायोसिस विद्यालयात चौथ्या वर्षात कॉम्प्युटर सायन्स च शिक्षण घेत होता. त्याने एका कंपनीत internship देखील केली होती. मात्र आता ती नोकरीच्या शोधात होता. पण त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अक्षयने या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, ‘ही शेवटची गोष्ट असेल जी मी लिहितोय. आई, बाबा, आकांक्षा मला माफ करा. तुमच्या अपेक्षा मला पूर्ण करता आल्या नाहीत यासाठी मी माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले पण मला जमलं नाही. माझ्या इन्टर्नशिपमध्ये मी चांगली कामगिरी केली नाही आणि त्यामुळे मला माहित आहे की मला चांगली नोकरी मिळणार नाही. हे सगळं तुम्हाला सांगायची माझ्यात हिंमत नाही. आता माझ्याकडे याशिवाय कोणताच पर्याय नाही. आई बाबा आकांशा मला माफ करा. तुमचा अक्षय माटेगावकर.”
अक्षय हा केवळ 21 वर्षांचा होता. त्याचे वडील मुंबईत नामांकित कंपनीत काम करतात तर आई प्राध्यापिका आहे. त्याच्या अचानक जाण्याने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.