Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: भोंडल्याच्या कार्यक्रमात मानसी नाईकचा जलवा; 'बघतोय रिक्षावाला'वर धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:21 IST

Manasi naik अर्चना नेवरेकर यांनीही त्यांच्या सोशल मीडिया पेजवर भोंडल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. 

ठळक मुद्देमानसीचं नुकतंच लग्न झालं असून लग्नानंतर तिचा हा पहिलाच भोंडला होता.

अभिनेत्री अर्चना नेवरेकर (archana nevrekar) आणि लीना नांदगावकर यांनी अलिकडेच मराठी कलाविश्वातील अभिनेत्रींसाठी भोंडल्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. इतकंच नाही तर प्रत्येक अभिनेत्रीने मोठ्या उत्साहात भोंडल्याचा फेर धरला. मात्र, या भोंडल्यानंतर मानसी नाईकने (manasi naik) प्रत्येक अभिनेत्रीला तिच्या तालावर नाचवलं. मानसीने तिच्या सुपरहिट ठरलेल्या 'बघतोय रिक्षावाला' या गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली आणि सोबतच इतर अभिनेत्रींनादेखील या डान्समध्ये सहभागी करुन घेतलं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मानसीने इन्स्टाग्रामवर भोंडल्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मानसीसह कलाविश्वातील अनेक लोकप्रिय अभिनेत्री दिसत असून बिग बॉस विजेती मेघा धाडेदेखील दिसून येत आहे. 

 मानसीने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मानसी आणि मेघा बघतोय रिक्षावालावर दिलखुलास डान्स करतांना दिसत आहेत.

दरम्यान, मानसीचं नुकतंच लग्न झालं असून लग्नानंतर तिचा हा पहिलाच भोंडला होता. अर्चना नेवरेकर यांनीही त्यांच्या सोशल मीडिया पेजवर भोंडल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.  

टॅग्स :मानसी नाईकसेलिब्रिटीमेघा धाडेनवरात्री