छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर. नुकताच धनश्रीचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसानिमित्त धनश्रीला अनेकांकडून शुभेच्छा मिळाल्या. विशेष म्हणजे धनश्रीचा लेक कबीरचा जन्म झाल्यानंतर धनश्रीचा हा पहिलाच बर्थडे होता. यामुळे यावर्षीच्या बर्थडेला धनश्री खूपच खुश होती. तसेच धनश्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या मित्रपरिवाराने तिला खास बर्थडे सरप्राईज दिलं आहे. या व्हिडीओत आईच्या बर्थडेच्या निमित्त कबीरही खूपच खूश होता. याचा एक व्हिडीओ धनश्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन असं लिहिलयं. धनश्रीला तिच्या टीमकडून खास सरप्राईज देण्यात आलं. हे पाहून धनश्री खूपच खूश झाली.
धनश्री ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे ग्लॅमरस लूकमधले अनेक फोटो तसेच सोशल मीडियावरील ट्रेडिंग रिल्स चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. याशिवाय ती कबीरसोबतचेही अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने कबीरचा शेतातला व्हिडीओ पोस्ट केला होता. स्ट्रॉबेरीच्या शेतातला कबीरचा क्युट व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडला होता.