Join us

Girija Oak Godbole First Kiss Experience: 'पहिल्या किसचा अनुभव कसा होता?' गिरिजा ओक-गोडबोलेने शेअर केला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 9:38 PM

गिरिजाने मालिका, चित्रपटांसोबत बेव सिरिजमध्येही अभिनय केला आहे.

Girija Oak Godbole First Kiss Experience: मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले ही विविधांगी भूमिकांमुळे चर्चेत असते. गिरिजाने मालिका, चित्रपट आणि त्यासोबतच रंगभूमीही गाजवली आहे. गिरिजा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांशी संपर्कात राहते. गिरिजाचा 'शोर इन द सिटी' या हिंदी चित्रपटातील किसिंग सीनची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती. गिरिजाने नुकताच एका मुलाखतीत पहिल्या किसचा अनुभव सांगितला.

गिरिजाने 'मिर्ची मराठी'ला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने अनेक प्रश्नांवर सडेतोड उत्तरं दिलं. तुझ्या पहिल्या किसचा अनुभव कसा होता, असा एक बोल्ड प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलं की पहिल्या किसबद्दल मला फारसं काही आठवत नाहीये. पण मी एवढं नक्की सांगू शकते की पहिल्या किसमुळे मला फार छान वाटलं नव्हतं. पहिला किस ही संकल्पनाच मला ओव्हररेटेड असल्यासारखी वाटते. कदाचित पहिल्या किसच्या वेळी मी लहान होते, अगदी कॉलेजमध्ये होते त्यामुळे मला तसं वाटलं असावं. मला एक गोष्ट नंतर जाणवली की पहिल्या किसचा माझा अनुभव खूप वेगळा आणि अविस्मरणीय असू शकला असता, असं गिरिजाने सांगितलं.

पहिल्या किसच्या वेळी पाऊस पडणं किंवा आम्ही दोघे जवळ येणं असं फार काही रोमँटिक घडलं नाही. त्यामुळे मला तसं वाटलं असावं, असंही ती म्हणाली. गिरिजा नुकतीच आल्ट बालाजीच्या कार्टेल या वेब सिरिजमध्ये झळकली होती. त्याशिवाय, आमिर खानबरोबर ‘तारे जमीन पर’ आणि ‘शोर इन द सिटी’ या हिंदी चित्रपटात ती दिसली होती. गिरिजा ही ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची मुलगी आहे.

टॅग्स :गिरिजा ओकवेबसीरिज