'हा माझा over confidence असेल कदाचित पण..'; ट्रोलिंगविषयी पुन्हा एकदा हेमांगी कवी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 05:50 PM2022-04-13T17:50:44+5:302022-04-13T17:51:51+5:30

Hemangi kavi: समाजात घडणाऱ्या वा तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ती उघडपणे व्यक्त होते. यात अनेकदा तिने तिची मत मांडल्यावर नेटकरी तिला ट्रोलही करतात.

marathi actress hemangi kavi give answers to users trolling on facebook | 'हा माझा over confidence असेल कदाचित पण..'; ट्रोलिंगविषयी पुन्हा एकदा हेमांगी कवी व्यक्त

'हा माझा over confidence असेल कदाचित पण..'; ट्रोलिंगविषयी पुन्हा एकदा हेमांगी कवी व्यक्त

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. उत्तम अभिनयासोबतच हेमांगी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही कायम चर्चेत असते. समाजात घडणाऱ्या वा तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ती उघडपणे व्यक्त होते. यात अनेकदा तिने तिची मत मांडल्यावर नेटकरी तिला ट्रोलही करतात. मात्र, या ट्रोलर्सकडे सपशेल दुर्लक्ष करत हेमांगी तिचं मत मांडत असते. इतंकच नाही तर अशा ट्रोलर्सला ती खडेबोलही सुनावते. अलिकडेच हेमांगीने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.

"माझ्या लक्षात आलंय की मी लहानपणापासून खूप कमी वेळा रडलेय. क्वचितच. स्वतःवर तर कधीच नाही. खरंच नाही. हे बरोबर की चूक हे ही मला कळत नाही. म्हणूनच की काय माझा बाकीचा रडण्याचा कोटा मला माझ्या कामातून भरून काढावा लागतो!  नाटकात, मालिका- चित्रपटांमध्ये मी इतकी रडलीये ना काय सांगू इतकी की माझ्या माणदेशातल्या दुष्काळी भागांचा पाण्याचा प्रश्न सुटेल.  काही लोकांना माझं stage, screen वरचं रडणं इतकं खरं वाटतं की ते रडायला लागतात, त्यांचा गैरसमज होतो की मी आयुष्यात खूप काही भोगलंय म्हणूनच माझ्या कामात ते दिसतं वगैरे! त्यांचा हा गैरसमज मला सुखावतो कारण म्हणजे मी बरं काम करते हा माझा समज होतो.(थोडीशी आत्मस्तुती) मला एक सवय आहे ती चांगली का वाईट हेही माहीत नाही. पण आहे.मला शरीरावर कुठे किरकोळ लागलं, खरचटलं, भाजलं, चिमटलं तर तात्पुरतं एक reflex action म्हणून मी react होते जसं की 'आ' म्हणून ओरडते, डोळे घट्ट मिटून ल्स-ल्स करते, कधी डोळ्यात पाणी येतं, कधी स्वतःच भरल्या डोळ्यांनी फुंकर मारते, नवरा बाजूला असलाच तर हात घट्ट पकडतो वगैरे वगैरे... पण हे सगळं अगदी काही सेकंदासाठी. त्यानंतर त्या जखमेवर औषध, मलमपट्टी वगैरे करत नाही. मी आयुष्यात कधीच tt चं injection घेतलं नाहीए. थोडक्यात दादापुता करत बसत नाही. यासाठी नवरा बऱ्याच वेळा रागावतो", असं हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे ती म्हणते, "काही वेळाने मला जखम झालीये हे मी टक्क विसरून जाते, सोडून देते, जखम तिचा वेळ घेऊन तिची तिची बरी होत जाते. मला कळत नाही. No औषध no मलम. हा माझा over confidence असेल कदाचित पण मी लहानपणी cycle चालवताना पडलीये, bike शिकताना पडलीये तेव्हा खूप लागलं ही होतं पण त्यावेळी ना मी कधी फार लक्ष दिलं ना घरच्यांनी. कित्येक वेळा खिळे बिळे लागलेत. लाकूड लागलंय, त्याचे व्रण ही आहेत अंगावर पण फार फार तर कैलास जीवन हे ointment लावण्यापलिकडे माझी गाडी कधी पुढे सरकलीच नाहीए. त्यामुळे आतापर्यंत तरी मी बरी आहे, म्हणून आला असेल हा अति शहाणपणा!  पण माझा dna तसा असेल, आई वडिलांचे संस्कार तसे असतील, आजूबाजूच्या परिस्थितीने शिकवलं असेल पण एका अर्थी मी strong आहे हे नक्की आणि त्यासाठी मी कायम grateful राहीन. "

"तर.... सांगायचा मुद्दा काय तर इतक्या वर्षात मी एक observe केलंय जी लोकं आपल्या शरीरावरच्या साध्या जखमेवर ही overreact होतात, operation झाल्यासारखं उपाय करत बसतात ना ती लोकं मनाच्या जखमेलाही खूप काळ कुरवळत बसतात, उपाय शोधत आणि करत बसतात, अधिकाधिक दुःखी होतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पण कामाला लावतात. किरकोळ जखम झाल्यावर ती सोडून द्यावी, ती बरोबर भरून निघते. आपलं शरीर एक जादू आहे आणि त्यात एक solid doctor लपून आपला उपाय करत असतो हे कुणी नव्याने सांगायला नको. मन सुद्धा शरीरातलाच एक भाग! हृदयाला connected असलेला मेंदू जवळचा! त्या भागाला जखम झाली तर त्याला किती महत्व द्यावं हे एकदा ठरवलं ना की सगळं ठीक होतं! सोडून देणे हा सर्वात उत्तम रामबाण उपाय!  Social media वर झालेलं trolling, कुणी मला काही बोललं आणि जर ते माझ्या मनाला लागलं तर मी हे असंच सोडून देते!"  

दरम्यान, या पोस्टच्या माध्यमातून हेमांगीने तिच्या स्वभावातील स्ट्राँगपणा अधोरेखित केला आहे. तसंच कोणीही कितीही ट्रोल केलं तरीदेखील त्या ट्रोलिंगला कसं समोरं जावं हेदेखील तिने सांगितलं आहे.

Web Title: marathi actress hemangi kavi give answers to users trolling on facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.