Join us

KK death : यमा तुला कधीच माफ करणार नाही....; KKच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 14:23 IST

KK death : मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिनेही केकेसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला..., अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  KK death: बॉलिवूड सिंगर केके (KK) उर्फ कृष्णकुमार कुन्नथ याच्या अकाली एक्झिटमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये केके परफॉर्म करत होता. यादरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि यानंतर काही तासांतच अचानक त्याच्या निधनाची बातमीच चाहत्यांना मिळाली. एक रोमॅन्टिक आवाज कायमचा शांत झाला.  अनेक बॉलीवूड-मराठी-साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केकेला पोस्टच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi-Dhumal) हिनेही केकेसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला..., अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही.... शाळा संपून कॉलेजमधल्या नवनवीन हवेत ‘यारों दोस्ती बडी ही हसीन है आणि पल’ या गाण्यांवर तरंगायला लागलो पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्यासारखं झालं. नव्वदच्या दशकातील लोकांना कळेल की मी काय म्हणतेय ते. काही काही गाण्यांनी, आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं, तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो. टाईम ट्रव्हल सारखं. काल रात्री ते सगळं गोठलं. सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक असा निघून गेलास, यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही...., असं हेमांगीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.  

टॅग्स :केके कृष्णकुमार कुन्नथहेमांगी कवीबॉलिवूड