Join us

भावंडांच्या गराड्यात बसलेल्या 'या' मुलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 13:59 IST

Marathi actress: या भावंडांच्या गराड्यात तिला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे.

दोन दिवसांपूर्वी सगळीकडे मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने आपल्या भावाला राखी बांधून हा दिवस मोठ्या थाटात साजरा केला. यात अनेक अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपल्या भावांसोबतचे फोटोही शेअर केले. यात सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होतोय. या अभिनेत्रीने तिच्या भावंडांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हा फोटो पाहिल्यावर तिला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे.

सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती तिच्या भावंडांसोबत दिसून येत आहे. तिचा हा फोटो साधारणपणे शालेय जीवनातील असल्याचं लक्षात येतं. या भावंडांच्या गराड्यात तिला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे. त्यामुळे चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत तू नेमकी कोणती आहेस? असा प्रश्न विचारला आहे. परंतु, फोटोत साधीसुधी दिसणारी ही मुलगी लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणामुळे जुईने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. तर, व्हायरल होत असलेला हा फोटो जुई हिचाच आहे. जुईने इन्स्टाग्रामवर रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिच्या भावंडांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे काही निवडक फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :जुई गडकरीटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमारक्षाबंधन