'...अन् चांद तुझ्या डोळ्यात'; मधुराणीचा 'ही' साडी आहे खूपच खास;कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:24 PM2023-10-13T13:24:00+5:302023-10-13T13:27:46+5:30

Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणीने नेसलेली साडी प्रचंड खास असून सध्या या साडीची नेटकऱ्यांंमध्ये चर्चा रंगली आहे.

marathi actress madhurani gokhale prabhulkar special saree | '...अन् चांद तुझ्या डोळ्यात'; मधुराणीचा 'ही' साडी आहे खूपच खास;कारण...

'...अन् चांद तुझ्या डोळ्यात'; मधुराणीचा 'ही' साडी आहे खूपच खास;कारण...

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन मधुराणीने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. इतकंच नाही तर मधुराणी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने काळ्या रंगाच्या साडीत सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या लूकमध्ये मधुराणी प्रचंड साधी, सोज्वळ नेहमी दिसते तशीच दिसत आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मधुराणीने या व्हिडीओमध्ये परिधान केलेली साडी ही हॅण्ड पेंट केलेली आहे. त्यामुळे तिच्यासाठी ती खास आहे. सोबतच 'अभी ना जाओ छोडकर,' हे गाणं बॅकग्राऊंडला सुरु आहे.

दरम्यान, मधुराणी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती चांगली कवयित्रीदेखील आहे. मधुराणी बऱ्याचदा तिच्या कविता वाचनाचा कार्यक्रम करत असते. मधुराणीने आतापर्यंत अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.

Web Title: marathi actress madhurani gokhale prabhulkar special saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.