'वाट बघतोय रिक्षावाला' या मराठी गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. अनेक मराठी सिनेमांमध्येही मानसीने काम केलं आहे. 'मस्त चाललंय आमचं', 'बाई वाड्यावर या', 'गुलाबी नोट' या गाण्यांमुळे मानसीला लोकप्रियता मिळाली. मराठी कलाविश्वातील करिअरप्रमाणेच मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मानसीने तिच्या बांगलादेशी क्रशबाबत खुलासा केला आहे.
मानसीने नुकतीच राजश्री मराठीच्या माय फर्स्ट विथ मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तिला तिच्या आयुष्यातील पहिली शिवी ते पहिला क्रश या गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. "कितवीत असताना पहिला बॉयफ्रेंड होता?" असा प्रश्न मानसीला विचारण्यात आला. यावर उत्तर देत मानसी म्हणाली, "बॉयफ्रेंड नाही...पण माझं बांगलादेशी मुलावर क्रश होतं." त्यानंतर मानसीला पहिल्या डेटबद्दलही प्रश्न विचारण्यात आला.
कंगनाला 'ओपेनहायमर'चं कौतुक, इंटीमेट सीन आणि भगवद्गीता वाचनाच्या दृश्यांबद्दल म्हणाली...
"मी खूप लहान होते जेव्हा माझं बांगलादेशी मुलावर क्रश होतं. वयाच्या अंतरामुळे आमच्यात काहीही झालं नसतं. पण, मला माझी पहिली डेट आठवत नाही," असं मानसी म्हणाली. "पहिल्यांदा नापास कधी झालीस?" असा प्रश्नही मानसीला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना मानसीने अप्रत्यरिक्षा घटस्फोटाबाबत भाष्य केलं. मानसी म्हणाली, "२०२१ साली आयुष्यात मी पहिल्यांदा नापास झाले."
धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनवर करण जोहरचं भाष्य, म्हणाला, "मी त्यांना..."
दरम्यान मानसी नाईकने १९ जानेवारी २०२१ साली प्रदीप खरेराशी लग्नगाठ बांधली होती. परंतु, नंतर वाद झाल्याने त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नुकतंच मानसीने नवीन घर घेतलं आहे.