Join us

मराठी अभिनेत्री मेघा धाडेची राहुल गांधींवर टीका, 'तो' व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 10:11 IST

एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

देशात लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. 19 एप्रिल पासून विविध राज्यात मतदानाला सुरुवात होणार असून 4 जून रोजी निकाल लागणार आहे. सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सिनेइंडस्ट्रीतही याची चर्चा होताना दिसते. अनेक स्टार कलाकारांना प्रचारासाठी बोलवलं जातं आहे. हे कलाकार उघडपणे एखाद्या पक्षाला सपोर्ट करताना दिसतात. अशातच एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

बिग बॉस मराठी फेम मेघा धाडे नेहमी सोशल मीडियावर आपली परखड मत व्यक्त करत असते. नुकतेच तिनं राहुल गांधींविरोधात पोस्ट केली आहे. राहुल गांधींवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  राहुल गांधींचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर तिनं शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्यांची लाज वाटते. राहुल गांधी माझा देश आणि नरकात जा'. 

मेघाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, राहुल गांधी यांना शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात येते. मग संबंधित नेत्याने महाराजांचा पुतळा टेबलावर ठेवला. पण राहुल गांधी मूर्ती दुसरीकडे ठेवण्यास सांगतात'. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून कॉग्रेसवर टीकास्थानी आलं आहे. दरम्यान, मेघा धाडे हिनं गेल्या वर्षी जून महिन्यात मेघाने भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.

टॅग्स :मेघा धाडेकाँग्रेसभाजपासेलिब्रिटीमराठी अभिनेताछत्रपती शिवाजी महाराजसोशल व्हायरलराहुल गांधी