मराठमोळी मिथिला पालकर (Mithila Palkar) ही गुणी अभिनेत्री. गोड चेहरा, कुरळे केस यामुळे जिथे जाईल तिथे मिथिला लक्ष वेधून घेते. गर्दीतही वेगळी ठरते. पण सध्या मात्र लोक मिथिलाला ट्रोल करत आहेत. कारण काय तर तिचा ड्रेस. होय, काल दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत Elle Beauty Awards 2022 सोहळा रंगला. या सोहळ्यात बॉलिवूडच्या जवळपास सर्वच अभिनेत्रींनी हजेरी लावली. ‘लिटिल थिंग्स’ फेम काव्या अर्थात मिथिलाही या अवार्ड फंक्शनमध्ये पोहोचली. यावेळी तिने शॉर्ट ब्लॅक ड्रेस कॅरी केला होता.
मोकळ्या कर्ली केसांमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. अनेक चाहत्यांना तिचा हा लुक आवडला. पण काहींनी मात्र यावरून मिथिलाला ट्रोल करायची नेमकी संधी साधली. शोल्डरलेस आणि खालच्या भाजूस एखाद्या डब्ब्यासारखा घेर असलेला मिथिलाचा ड्रेस पाहून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
‘अरे मेरी अम्मा सुबह से पुछ रही है डोअरमॅट कहां गया? अब पता चला कहां गया...,’अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली. डब्बा ले कर आ गई ये तो,.., असं एकाने लिहिलं. हा ड्रेस घालून ही बसणार कशी? असा भन्नाट प्रश्न एका युजरला पडला. तुझी डिझाईनर उर्फी आहे का? अशा प्रश्न एकाने केला.
मिथिलाने कॉलेज प्रोजेक्टसाठी स्वत:चं एक युट्यूब चॅनल काढलं होतं. एकदिवस मिथिलाने युट्यूबवर संगीताचे काही बेसिक रिदम पॅटर्न शिकून त्याला अनुसरून एक कप साँग तयार केलं. त्याचा व्हिडिओ तिने स्वत:च्या युट्यूब चॅनलवर शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ प्रचंड गाजला होता. या व्हिडीओने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. बॉलिवूडच्या काही लोकांनी सुद्धा तिच्या या व्हिडिओला दाद दिली होती. परेश रावल, इम्तियाज अली, स्वानंद किरकिरे यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता.
मिथिलाने 2014 ला माझं हनिमून नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये पहिल्यांदा काम केलं. ही फिल्म 16व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली. जून 2014 मध्ये तिला कट्टी बट्टी हा सिनेमा मिळाला. नंतर मिथिलानं वेब सीरिज, मराठी, हिंदी सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मुरांबा या मराठी सिनेमामुळे ती सर्वांच्याच डोळ्यांत भरली. कारवाँ या हिंदी सिनेमातील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. लिटिल थिंग्ज या या सीरिजनंही तिला एक वेगळी ओळख दिली.