Video : मृणाल दुसानिसच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? चाहते म्हणतात, 'तुझीच कार्बन कॉपी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 01:55 PM2023-04-21T13:55:24+5:302023-04-21T13:56:35+5:30

मृणाल दुसानिस गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. तिने नुकताच लेकीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

marathi actress mrunal dusanis shared daughter nurvi video fans says carbon copy | Video : मृणाल दुसानिसच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? चाहते म्हणतात, 'तुझीच कार्बन कॉपी...'

Video : मृणाल दुसानिसच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? चाहते म्हणतात, 'तुझीच कार्बन कॉपी...'

googlenewsNext

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) छोट्या पडद्यावरुन गायब आहे. सध्या ती अमेरिकेत राहत असून घर संसारात रमली आहे. गेल्याच वर्षी २४ मार्च रोजी मृणालने गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव नुर्वी (Nurvi) असे ठेवण्यात आले. नुर्वीचा एक गोंडस व्हिडिओ मृणालने शेअर केला आहे. 

मृणाल दुसानिस गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. पती नीरज मोरे आणि मुलगी नुर्वीसह आनंदात आहे. चिमुकल्या नुर्वीचा सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ मृणालने शेअर केलाय. नुर्वी खूपच गोड असून अगदी आईसारखीच दिसतीए. 'माय बेबी गर्ल' असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. 

या व्हिडिओ चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'सो क्युट','मृणाल तुझी कार्बन कॉपीच आहे ही' अशा कमेंट व्हिडिओवर आल्या आहेत. २०२० पर्यंत मृणालने अभिनय क्षेत्रात काम केले. मृणाल 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत शेवटची दिसली. यातील तिची आणि शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांनाही आवडली. 

२०१६ मध्ये मृणालने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कामानिमित्त तो आधीपासूनच अमेरिकेत असल्याकारणाने नंतर मृणाललाही तिकडेच स्थायिक व्हावे लागले.सुखाच्या सरींनी मालिकेवेळी ती भारतात आणि नीरज अमेरिकेतच होता. मालिका संपताच ती अमेरिकेत गेली. मृणाल आता पुन्हा अभिनय क्षेत्रात परतणार का याबद्दल तिने अजुन काहीच सांगितलेले नाही. 

Web Title: marathi actress mrunal dusanis shared daughter nurvi video fans says carbon copy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.