मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande ) सध्या चर्चेत आहे ती तिच्या नव्या को-या वेबसीरिजमुळे. ‘सोप्पं नसतं काही’ ही मृण्मयीची वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. यात ती शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकरसोबत दिसणार आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर रिलीज होणाºया या वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय मृण्मयीच्या एका व्हिडीओचीही जबरदस्त चर्चा रंगलीये.होय, मृण्मयीने एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बॅकग्राऊंडमध्ये ‘आज इबादत रूबरू हो गई....’ या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील सुरेल गाण्याचे बोल आणि सोबतीला मृण्मयीचा सौज्वळ अदा असा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
मृण्मयीच्या चाहत्यांना या व्हिडीओने अक्षरश: वेड लावले आहे. या व्हिडीओत मृण्मयी साजसृंगार करून वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. लोभस, बोलके डोळे आणि ओठांवरचे मनमोहक हास्य पाहून चाहते मृण्मयीच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत. सुंदर, अप्रतिम, उत्तम, गोड अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
‘सोप्पं नसतं काही’चा ट्रेलर
मृण्मयीने ‘सोप्पं नसतं काही’ या वेबसीरिजचा ट्रेलरही शेअर केला आहे. यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नेमके काय होते? आता मृण्मयी या दोघांबरोबर राहणार का? की आणखी काही पर्याय निवडणार, याची उत्तरे प्रेक्षकांना वेब सीरिज पाहिल्यावरच मिळतील. प्लॅनेट मराठी ओटीटी वर 31 ऑगस्टपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल. ‘पॉलिअॅमरी’ हा नात्याचा एक नवीन प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहे. एक स्त्री आणि एक पुरुष ही आपल्यासाठी जोडप्याची व्याख्या. परंतु ‘पॉलिअॅमरी’ संकल्पनेत दोन पुरुष आणि एक स्त्री किंवा दोन स्त्रिया आणि एक पुरुष असे एकत्र राहतात. या संकल्पनेवर ही वेबसीरिज आधारित आहे.