Join us

बॉलिवूडच्या भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी आणि मलायकाला हॉटनेसमध्ये टक्कर देतेय ही मराठीमोळी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:30 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे असते चर्चेत

नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती.  या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. 

बॉलिवूडच्या अभिनेत्रीच्या बोल्डनेसला टक्कर देतील असे फोटो नेहा खान हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये नेहाने क्लीवेज शो ऑफ केलं आहे तर ट्रान्सपरेंट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

नेहा खान शिकारी चित्रपटानंतर 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.

नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

इतकेच नाही तर नेहा शाहरूख खानसोबत जाहिरातीत झळकली आहे.  'युवा' या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलं आहे.

टॅग्स :नेहा खान