Join us

Raanabaazaar: 'मसाला गुटखा वगैरे खातेय असं..'; नव्या पोस्टमुळे प्राजक्ता पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 19:35 IST

Prajakta mali: मराठीत पहिल्यांदाच एका बोल्ड कंटेटवर वेब सीरिज करण्यात आली. या सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी तेजस्विनी पंडित यांचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर  'रानबाजार' (Raanabaazaar) या सीरिजने धुमाकूळ घातला आहे. मराठीत पहिल्यांदाच एका बोल्ड कंटेटवर वेब सीरिज करण्यात आली. या सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini pandit) यांचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला. नुकतेच या सीरिजचे सगळे भाग प्रदर्शित झाले असून आता प्राजक्ता या सीरिजविषयीचे तिचे अनुभव शेअर करत आहे.

'रानबाजार' या सीरिजमध्ये प्राजक्ताने कामाठीपुरातील रत्ना या स्त्रीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिच्याप्रमाणे सगळा गेटअप, चेहऱ्यावरील हावभाव, वागण्या-बोलण्याची पद्धत प्राजक्ताने शिकून घेतली. इतकंच नाही तर  या सीरिजमध्ये प्राजक्ताच्या तोंडात सतत मसाला गुटखा चघळताना दिसते. मात्र, हा खरोखरचा गुटखा नसून त्याजागी ती बडीशेप खात असल्याचं तिने सांगितलं. याविषयीचा एक व्हिडीओदेखील तिने पोस्ट केला आहे.

"Vanity मध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा वगैरे खातेय असं भासवण्याची practice… (ह्या दिवशी पहिल्यांदा make up केला होता… सुंदर दिसण्यासाठी नाहीत अर्थात..) काल सगळे एपिसोड्स आलेत…लवकर पुर्ण series बघून टाका", असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान, या सीरिजमध्ये प्राजक्ता आणि तेजस्विनी व्यतिरिक्त अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. या सीरिजमध्ये मुख्यमंत्री सतीश नाईक ( मोहन आगाशे), सयाजी पाटील ( मोहन जोशी), पत्रकार दिवेकर ऊर्फ आप्प्पा (मकरंद अनासपुरे), निशा (उर्मिला कोठारे), युसूफ पटेल (सचिन खेडेकर), इन्स्पेक्टर पालांडे (वैभव मांगले), रावसाहेब यादव ( अनंत जोग) , प्रेरणा सयाजीराव पाटील ( माधुरी पवार) या सर्वांनीच आपापल्या भूमिका अगदी चोख पार पाडल्या आहेत.  

टॅग्स :रानबाजार वेबसीरिजप्राजक्ता माळीसेलिब्रिटीवेबसीरिज