रसिका सुनील (Rasika Sunil) ही मराठीतील एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते झी मराठी वरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आलेली. तिने साकारलेले शनाया हे पात्र आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. काहीशी खलनायिका भूमिका असली तरी प्रेक्षकांना तिचा वेडेपणा, साधेपणा भावला. पण, तुम्हाला माहिती आहे का सर्वांच्या लाडक्या शनायाचा नवरा नेमकं काय करतो आणि कुठे राहतो. तर याबद्दल जाणून घेऊया.
रसिकाच्या नवऱ्यांचं नाव आदित्य बिलागी अस आहे. रसिका आणि आदित्य बिलागी २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यांचं लग्न चांगलंच चर्चेत आलं होतं. सध्या आदित्य आणि रसिका हे वेगळे राहतात. कारण, आदित्य हा अमेरिकेत राहतो. तर अभिनेत्री असल्यानं रसिका कधी अमेरिका तर कधी भारतात असते.
आदित्य हा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अमेरिकेतील एका कंपनीत तो काम करतो. ऐवढीच आदित्यची ओळख नाही तर तो इतरही अनेक कलांमध्ये पारंगत आहे. रसिकाने शेअर केलेल्या व्हिडीओमधून तो जबरदस्त डान्स करत असल्याचंही दिसून आलं आहे. याशिवाय तो गिटारही उत्तम वाजतो. यासोबतच त्याला स्केटिंग करायची आवड आहे. फक्त ऐवढचं नाही तर आदित्य तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे.
रसिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती नुकतेच 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमात सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसली. तिच्या या भुमिकेचंही खूप कौतुक झालं. तर यापुर्वी रसिका ही 'डाएट लग्न' या तिच्या भन्नाट नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.'डाएट लग्न' नाटकातून रसिका आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके पहिल्यांदाच एकत्र काम केलं. विजय केंकरे यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं असून हे त्यांचं १०१ वं नाटक आहे. आता चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टच्या वाट पाहत आहेत.