Join us

'जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत...' आर्चीने केली पोस्ट, चाहत्यावर भडकल्याचा Video झालेला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 4:09 PM

'तुमची मुलगी असती तर...?' असं ती म्हणाली होती. त्या व्हिडिओवर रिंकूने आता स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुची (Rinku Rajguru) क्रेझ आजही कायम आहे. सिनेमाला इतकी वर्ष झाली, आर्ची परश्याच्या लूकमध्येही बराच बदल झाला. तरी चाहत्यांमध्ये आजही आकाश आणि रिंकू परश्या आणि आर्ची म्हणूनच ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वी रिंकू जळगावमधील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेव्हा झालेल्या गर्दीत एका चाहत्याचा हात लागल्यावर ती भडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 'तुमची मुलगी असती तर...?' असं ती म्हणाली होती. त्या व्हिडिओवर रिंकूने आता स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले, 

'जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत,

नुकतंच मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमात पसरवल्या जात आहेत. कार्यक्रम ठिकाणी अशी कोणतीच घटना झाली नसून माझा हात खेचल्यामुळे एक representative शी मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये, ही विनंती. तुमची रिंकू.'

रिंकूने असं काहीच घडलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती चाहत्याला बोलताना दिसते. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

रिंकूचा 'झिम्मा 2' सिनेमा सुपरहिट झाला. यामध्ये तिने साकारलेली निर्मिती सावंतच्या सूनेची भूमिका गाजली. निर्मिती सावंत आणि रिंकूचे मजेशीर सीन्स प्रेक्षकांना पोट धरुन हसवून गेले. रिंकूच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसोशल मीडियामराठी अभिनेताजळगाव