Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आवडता कलाकार कोण? सई ताम्हणकरने दिलं हे खास उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 16:32 IST

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील मधील सईचा आवडता कलाकार याविषयी तिने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना मनमोकळं उत्तर दिलंय

सई ताम्हणकर ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये कलाकारांच्या अभिनयाचं परीक्षण करते. गेल्या अनेक वर्षांपासून सई ताम्हणकर ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाशी जोडलेली आहे. सई लवकरच 'मानवत मर्डर' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. सई ताम्हणकरने या वेबसीरिजनिमित्ताने लोकमत फिल्मीशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बद्दल सईने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. 

सई ताम्हणकर हास्यजत्रेबद्दल काय म्हणाली?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सई इतक्या वर्षांपासून दिसतेय. या कार्यक्रमातील सईचा आवडता कलाकार कोण हे विचारलं असता सई म्हणाली, "आम्ही हास्यजत्रेतील कलाकारांना अभिनयात प्रगल्भ होताना पाहिलंय.  त्यामुळे हा खूप कठीण प्रश्न आहे. या कलाकारांचा आधीचा वावर आणि आताचा वावर याच्यामधला फरक आम्ही डोळ्यांनी पाहिलाय. त्यामुळे हास्यजत्रामधील प्रत्येक व्यक्तीवर मी मनापासून प्रेम करते.

सई पुढे लिहिते, "प्रभाकर मोरेंची एक शैली आहे. हास्यजत्राची गंमत कशी आहे की, एक कलाकार जे करु शकतो ते दुसरा कलाकार करु शकत नाही. प्रत्येकामध्ये एक वेगळेपणा आहे. आणि ही गोष्ट फार विलक्षण वाटते मला. प्रत्येकाचा बाज, शैली ही एकमेकांपासून इतक्या भिन्न आहेत की फार कमाल वाटते." सई लवकरच मानवत मर्डर या वेबसीरिजमधून भेटीला येणार असून ही वेबसीरिज ४ ऑक्टोबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी