Join us

Video: मुलीसह समिधा गुरुने फॉलो केला ट्रेंड; मायलेकींमध्ये रंगली कमाल जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 14:10 IST

Samidha guru: अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली समिधा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

मराठी कलाविश्वातील बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे समिधा गुरु (samidha guru). अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली समिधा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रत्येक ट्रेंड ती फॉलो करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक ट्रेंड फॉलो केला आहे. 

समिधा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती तिच्या लेकीसोबतचे फोटो वा व्हिडीओ शेअर करत असते. यात खासकरुन तिच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळते. त्यामुळे समिधा तिच्या लेकीसोबत कायम नवीन ट्रेंड फॉलो करत असल्याचं पाहायला मिळतं. यावेळी तिने आणि तिच्या लेकीने दुर्वाने एका ट्रेंडी गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दरम्यान, दुर्वादेखील तिच्या आईप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. इतंकच नाही तर ती देखील आईप्रमाणेच उत्तम डान्सर असल्याचं या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये चर्चेत येत आहे. 

टॅग्स :समिधा गुरूसेलिब्रिटीटिव्ही कलाकार