Join us

तुला पाहुन याडं लागलं...! अभिनेत्री सायली संजीव झाली रोमॅन्टिक, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 17:34 IST

Sayali Sanjeev romantic video viral : होय, सायलीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक रोमॅन्टिक रील शेअर केलं आहे आणि या रीलनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) मनमोहक सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. सायली एक गुणी अभिनेत्री. मराठी इंडस्ट्रीत तिचं मोठं नाव आहे. नुकतंच सायलीच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला. तेव्हापासून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सध्या याच सायलीचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. होय, सायलीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक रोमॅन्टिक रील शेअर केलं आहे आणि या रीलनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

या रीलमध्ये सायलीसोबत आहे तो अभिनेता नितीश चव्हाण ( Nitish Chavan). दोघांचाही रोमॅन्टिक अंदाज व्हिडीओत पाहायला मिळतोय. अर्थात यावरून भलते सलते अर्थ मात्र काढू नका...!! कारण या व्हिडीओचं निमित्त वेगळं आहे. नुकतंच सायली व नितीन दोघांचं ‘तुला पाहुन’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्यावर त्यांनी हा रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे.  तुला पाहुन याडं लागलं...असं कॅप्शन देत सायलीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.  नितीश आणि सायलीचं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या गाण्यावर अनेक रीलही बनवले जात असल्याचं दिसत आहे.

मध्यंतरी सायली संजीव व क्रिकेटपटू ऋतुराजच्या अफेअरची चर्चा रंगली होती. सायलीच्या एका फोटोवर ऋतुराजने ‘व्वा’ अशी कमेंट केली होती. त्याच्या या कमेंटला सायलीने देखील रिप्लाय दिला होता. तिने त्यावर हार्ट इमोजी सेंड केले होते. सायलीचा हा रिप्लाय पाहून दोघांमध्ये मैत्रीपलीकडचं नातं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सायली संजीव सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून ती बºयाचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.  

टॅग्स :सायली संजीवनितीश चव्हाण