Join us

'..तो दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहील'; शिवानी बावकरने घेतली शरद पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:33 IST

Shivani baokar: या पोस्टमध्ये तिच्यासोबत शरद पवार, राजेश टोपे आणि रावसाहेब दानवे दिसून येत आहेत.

'लागिरं झालं जी' (lagir zal ji) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर (shivani baokar). या मालिकेत शितल पवार ही भूमिका साकारुन शिवानीने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. शिवानी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकताच तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

काही दिवसापूर्वीच सर्वत्र आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या दिवशी खास पोस्ट शेअर केल्या. त्यात शिवानीनेदेखील एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिच्यासोबत शरद पवार, राजेश टोपे आणि रावसाहेब दानवे दिसून येत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने या फोटोमागील कथा सांगितली आहे.

"जय जय राम कृष्ण हरी, जय जय हरी विठ्ठल ...राजेश सरकटे निर्मित 'गजर पंढरीचा' रौप्य महोत्सवी भक्तीमय कार्यक्रमाचा आषाढी एकादशी निमित्त आस्वाद घेतला आणि मन अगदी प्रसन्न झाले. आषाढी एकादशीचा तो दिवस माझ्या नेहमी स्मरणात राहील याची खात्री आहे. माननीय श्री शरद पवार साहेब, माननीय श्री रावसाहेब दानवे साहेब आणि माननीय श्री राजेश टोपे साहेब अश्या सुश्रुत व्यक्तींची भेट होणे व त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळणे हा माझ्यासाठी अतिव आनंदाचा अनुभव", अशी पोस्ट शिवानीने शेअर केली आहे.

दरम्यान, 'लागिरं झालं जी' या मालिकेच्या यशानंतर शिवानी कुसुम या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत शिवानीचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळात असून तिच्या या भूमिकेलाही नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

टॅग्स :शिवानी बावकरशरद पवारसेलिब्रिटी