कमालीचा अभिनय आणि मेहनतीने अभिनेत्री शिवानी रांगोळेने मराठी कलाविश्वातील ओळख मिळवली. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या शिवानीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बन मस्का' या मालिकेमुळे शिवानीला लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. सध्या शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेच्या संपूर्ण टीमने नुकतीच 'चला हवा येऊ द्या'मध्ये हजेरी लावली होती. या मालिकेत सध्या अधिपती आणि अक्षराच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने 'चला हवा येऊ द्या'मध्ये अधिपती-अक्षराच्या लग्नाचा गोंधळ घालण्यात आला. 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये शिवानीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. शिवानीने या शोमध्ये तिची एक कविता सादर केली.
शिवानी रांगोळेची कविता
वाट आता वेगळी आहेपावलांना सांगायचे आहे,नको रमूस त्याच वळणापाशीउरातली धडधड गिळून टाक...
नजरेला नजर नको पुन्हानको तो मनाचा खेळ मनाशी...
चहाच्या वाफेत उडून गेली वेळघोट घेत राहिलो शांततेचे,शेवटी उसासे ठरले बोलके...
घेऊन जाशील सगळे माझेश्वास तेवढा ठेवून जा,शब्दांचे ओझे तेवढे कर हलके...
मागे वळून पाहशील मला मी धुक्यात विलीन असेन, माझ्या मनातही...मी एकटा असेन.
निरोप देताना उशीर करू नकोसचुकून पाहशील डोळ्यांत माझ्यात्या चकव्याला भुलू नकोस...
शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कवितेचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. शिवानीने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सुभेदार' चित्रपटात ती ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती. याबरोबरच शिवानीने 'आम्ही दोघी', 'सांग तू आहेस का' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'अँड जरा हटके', 'फुंतरू' या चित्रपटांतही ती झळकली.