Join us

मराठी अभिनेत्रीच्या घरी कोणी तरी येणार गं, नुकताच पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 15:55 IST

“चांदण्यात न्या गं तिला, नटवा सजवा तिला, झोपाळे झुलवा भोवताली बसा तिच्या, काय हवं पुसा तिला, डोहाळे पुरवा कोणी तरी येणार येणार गं....”म्हणत मैत्रीणीही तिचे लाज पुरवताना दिसले.

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही अभिनेत्री आहे स्मिता तांबे, स्मिताच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहे. 

स्मिता तांबेला आठवा महिना लागलाय. त्यामुळे ती माहेराला जाण्याआधी परंपरेनुसार तिच्या डोहाळे जेवणाचा खास कार्यक्रम तिच्या मैत्रीणींनी योजित केला होता. “चांदण्यात न्या गं तिला, नटवा सजवा तिला, झोपाळे झुलवा भोवताली बसा तिच्या, काय हवं पुसा तिला, डोहाळे पुरवा कोणी तरी येणार येणार गं....”म्हणत मैत्रीणीही तिचे लाड पुरवताना दिसले.

 मैत्रीणींनी तिचा  साजश्रृंगार करत तिचा हा क्षण ख-या अर्थान स्पेशल बनवला. इतकंच नाहीतर स्मितासुद्दा आई होण्याचा आनंद लपवू शकली नाही. कोडकौतुकात हरखून गेली होती. पुढल्या महिन्यात येणा-या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आतुर आहेत.सोशल मीडियावर स्मिता तांबेच्या चाहत्यांनीही अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

स्मिता तांबे २०१९ मध्ये नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदीसह लग्नबंधनात अडकली होती.हे लग्न दोन पद्धतीने पार पडलं होतं. मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडलं होतं. या लग्नसोहळ्यालाही सिनेसृष्टीतील मित्र मैत्रीणींनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या होत्या.स्मिता आपल्या पतीसोबत नेहमी सोशल मीडिया वर फोटो शेअर करत कपल गोल्स देत असते.तिच्या या फोटोंनाही चाहते भरभरुन लाईक्स कमेंट्स करत पसंती देत असतात.

स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'जोगवा', '७२-माईल्स', 'परतु', 'देऊळ' यासह विविध मराठी सिनेमात तसंच 'सिंघम रिटर्न्स', 'रुख' अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाने स्मितान आपला वेगळा ठसा तर उमटवला आहेच. तसेच स्मिता तांबे आपल्या सामाजिक जाणिवां विषयी सजग असते. ‘कोस्टल बीच क्लिनिंग’मध्ये स्मिता सहभागी होताना दिसली होती. 

टॅग्स :स्मिता तांबे